Sunday 15 October 2023
दि 2 एप्रिल 2023 सकाळी 9-26 फलटण या नुसारकुंडळी तयार केली .
बदली नियम ---10 भावाचा संब 3,10,12 / 3,5,9 या भावाचा कारयेश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये बदली होते
या पत्रिकेत 10 भावाचा संब रवी आहे . रवीचे करयेशतव खालीलप्रमाणे आहे
PLANET : SUN
रवी 3, 5,10,11 या अनुकूल भावाचा कारयेश आहे . बदली होणार हे निक्षित सांगता येईल . आता केंव्हा होईल ते पहाणीसाठी आपणाला दश पहाव्या लागतील .
कुंडळी सोडवितेवेळी केतू महादशा शुक्र अंतर्दश चालू होती २४ जुलै 2023 पर्यन्त आहे
PLANET : KETU
PLANET : VENUS
केतू 5,6,9,10,11,12 या भावांचा कारयेश आहे या पैकी 5,9,10,12 अनुकूल आहेत .
PLANET : MERCURY
केतू महादशा शुक्र अंतर्दशा बुध विदश 30 एप्रिल ते 30 जून 2023 पर्यन्त आहे
आता वाचाकांच्या दृष्टिकोनातून प्रश्न असा निर्माण होतो ---बदली दोन वेळ का झाली ?
10 भावाचा सब रवी मीन या दविस्वभाव राशीत असून तो बुधाच्या नक्षत्रात आहे . आणि बुध पुनरावृत्ति घडवून आणणार ग्रह आहे . म्हणून सदर स्त्रीची दोनदा बदली झाली .
Sunday 24 September 2023
व्हिजा केंव्हा येईल ?
Thursday 1 December 2022
जन्मवेळ काढणे
नागपूरच्या एका व्यक्तीने फोन केला आणि म्हणाला माझ्या आईची पत्रिका काढायची आहे मला फक्त साल माहित आहे . तारीख वेळ माहित नाही . तर पत्रिका काढता येईल का ? मी म्हटले रुलिंग प्लॅनेट वरून पत्रिका काढता येईल. त्याने आईचे जन्मसाल सांगितले १९४०.
कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ काढता येते. रुलिंग मधील लग्न राशीतून रवी भ्रमण केंव्हा होते ते पाहावे त्यावरून आपणाला महिना ठरविता येईल. रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून जेंव्हारवी चे भ्रमण होईल त्यावरून आपणाला अंदाजे तारीख कळेल. रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून उपनक्षत्रातून चंद्राचे भ्रमण पहिले असता आपणाला अचूक तारीख कळेल. , तसेच रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून उपनक्षत्रातून उप उप नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण होईल त्यावेळी अचूक जन्मवेळ काढता येईल.
मी जेंव्हा कुंडली काढावयास सुरुवात केली त्यावेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे होते .
३० नोव्हेंबर २०२२ वेळ--२१-५०-०५
शनी लग्न नक्षत्रस्वामी , चंद्र लग्न स्वामी , राहू नक्षत्र स्वामी , शनी राशिस्वामी , वार बुधवार
चंद्र , राहू , शनी , बुध या रुलिंग चा वापर केला .
कर्क राशीमध्ये शनी नक्षत्र आहे . म्हणून कर्क राशीतून शनी नक्षत्रातून भ्रमण रवीचे भ्रमण केंव्हा होते पहिले ते येते २१ जुलै रोजी .
कर्क राशीतून शनी नक्षत्रातून राहू उप नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण पहिले ते येते २९ जुलै रोजी .
कर्क राशीतून शनी नक्षत्रातून राहू उप मधून बुध उप उप मधून चंद्राचे भ्रमण पहिले असता वेळ येते पहाटे ५ वाजून ५४मिनिटे ०३ सेकंड
अशा प्रकारे केवळ साला वरून तारीख जन्मवेळ ठरवली. ( तारीख २९ जुलै १९४० , वेळ--पहाटे ५-५४-०३ नागपूर )
Wednesday 30 November 2022
के.पी.-४ स्टेप ऍडव्हान्स थेअरी
के.पी. ४ स्टेप ऍडव्हान्स चे नियम खालीलप्रमाणे ----
१) पहिल्या पायरीवरील ग्रहाचा विचार---
ग्रहाच्या नक्षत्रात इतर कोणताही ग्रह नसेल तर तो ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होतो . ( त्या भावात ग्रह असले तरी ) तसेच त्याच्या भावेशाच्या भावात कोणताही ग्रह नसेल तर त्या भावाचा तो बलवान कार्येश होतो . परंतु भावेशाच्या भावात ग्रह असेल तर तो त्या भावाचा कार्येश होणार नाही.
उदा.-- रवी ग्रहाच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नसेल व रवी पंचम भावात असेल आणि पंचम भावात इतर ग्रह नसतील तर रवी पंचम भावाचा बलवान कार्येश होईल. रवी --५
२) पहिल्या पायरीवरील ग्रहाच्या नक्षत्राचा विचार
ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळ देतो. हा कृष्णमूर्तींचा मूलभूत सिद्धांत आहे .
पहिल्या पायरीवरचा ग्रहाचा नक्षत्र स्वामी ज्या भावात आहे त्या भावात इतर ग्रह असले तरी तो त्या भावाचा बलवान कार्येश होतो. तसेच भावेशाच्या भावात कोणताही ग्रह नसेल तर तो त्या भावाचा बलवान कार्येश होईल. परंतु भावेशाच्या भावात ग्रह असेल तर तो त्या भावाचा बलवान कार्येश होणार नाही .
उदा.--- वरील रवी ग्रहाचा विचार करू -- रवी शुक्राच्या नक्षत्रात सप्तमात आहे . सप्तमात शुक्र बरोबर मंगल व गुरु आहे . शुक्र सप्तमात आहे म्हणून शुक्र सप्तमाचा बलवान कार्येश होईल
३) पहिल्या पायरीवरील ग्रहाच्या उप नक्षत्राचा ( सब )विचार---
या पायरीवर पहिल्या नियमाचा वापर करावयाचा आहे .
४) या पायरीवर उप नक्षत्र स्वामींच्या (सब )नक्षत्राचा विचार ----
या पायरीवर दुसऱ्या नियमाचा वापर करावयाचा आहे .
५) स्वनक्षत्रात असलेला ग्रह ---
स्वनक्षत्रात असलेला ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होईल , त्याचबरोबर त्याच्या भावेशाच्या भावात ग्रह नसेल तर त्या भावाचा बलवान कार्येश होईल. भावेशाच्या भावात ग्रह असेल तर त्या भावाचा बलवानकार्येश होणार नाही .
६) भावारंभी ग्रहाचा विचार ----
भावारंभी असणारा ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होईल. परंतु तो ग्रह मागील भावात असून पुढील भावारंभी असेल तर तो दोन्ही भावाचे बलवान कार्येश होईल.
उदा.-- समजा ४ भावारंभ ५ अंश ४५ कला ३३ विकला असेल आणि मंगल ग्रह ३ अंश २५ कला असेल तर तो तिसऱ्या व चौथ्या भावाचा बलवान कार्येश होईल. जास्त करून ४ त्या भावाचे फळ देईल.
७)राहू केतू विचार ---
कृष्णमूर्ती मध्ये राहू व केतू याना अनन्यसाधारण महत्व आहे . राहू केतू वेगवेगळ्या प्रकारे फळ देतात. राहू केतू च्या नक्षत्रात ग्रह नसेल किन्वा राहू केतू नक्षत्रस्वामी म्हणून येत असेल तर राहू केतू ज्या स्थानात आहेत त्याचे फळ देतात. राहू केतून स्वतः च्या राशी नाहीत , परंतु ते ज्या राशीत आहेत त्या राशिस्वामी चे फळ देतात. तसेच राहू केतू ज्या ग्रहांच्या युतीत असतील किंवा ज्या ग्रहांच्या दृष्टीत असतील त्यांचे सुद्धा फळ देतात. राहू केतू एकूण ४ प्रकारे फळ देतात. १) स्थानाचे २) राशी स्वामींचे ३) युतीतील ग्रहांचे ४) दृष्टीतील ग्रहांचे
८) युती अथवा दृष्टी चा विचार ---
पारंपरिक ज्योतिशास्त्रामध्ये अनेक योग्य आहेत उदा.. युती , लाभ , केंद्र , नवपंचम , षडाष्टक , प्रतियोग, द्विद्वदर्शक . यापैकी काही योगाचा विचार कृष्णमूर्तीनी केला आहे . सर्व ग्रह सप्तम दृष्टीने पूर्ण दृष्टी टाकतात. या व्यतिरिक्त मंगळाची ४,८ गुरुची ५,९ व शनीची ३,१० दृष्टी विचारात घेतली आहे . दृष्टी अथवा युती यांच्यामधील दिप्तांश ३ अंश २० कला घ्यावा . परंतु सरावानें ५ अंशापर्यंत घ्यावयास हरकत नाही. जास्तीतजास्त ८ अंशापर्यंत घ्यावी
प्रा.कोरडे पी. आर. ( नक्षत्र शिरोमणी )
एम एस्सी डी एच ई
Saturday 26 November 2022
सब --चंद्र सिद्धांत किंवा सब चंद्र कनेक्शन थेअरी
लग्नाचा उपनक्षत्र स्वामी किंवा सब हा कोणत्याही प्रकारे चंद्राशी संबंधित असावा .
१) प्रथम भावाचा सब चंद्र असावा .
२) प्रथम भावाचा सब हा कर्क राशीत असावा .
३) प्रथम भावाचा सब च राशिस्वामी / नक्षत्र स्वामी हा चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी असावा
४) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी व चंद्राचा नक्षत्रस्वामी एकाच असावा .
५) प्रथम भावाचा सब चा नक्षत्रस्वामी व चंद्राचा राशिस्वामी एकाच असावा .
६) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी व चंद्राच्या राशिस्वामी / नक्षत्रस्वामी यांच्यामध्ये दृष्टी योग्य किंवा युतीत असावेत.
७) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी तिसऱ्या ग्रहाच्या माध्यमातून चंद्राच्या राशिस्वामी किंवा नक्षत्रस्वामी शी संबंधित असावेत.
८) दृष्टी अथवा युती साध्या कुंडलीप्रमाणे पहावी.
जन्मवेळेत याही पुढे अचूकता आणण्यासाठी कुटुंबातील सर्वांच्या कुंडल्या घ्याव्यात. ( जातक , जातकाचे आई , वडील, भाऊ , बहीण , बायको , मुलगा मुलगी )
जातकाच्या ४ भावाचा सब चा आईच्या पत्रिकेतीळ चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . , जातकाच्या ९ व्या भावाचा सब चा वडिलांच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ११ व्या भावाचा सब चा मोठ्या भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकांच्या ३ ऱ्या भावाचा सब चा धाकटी भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ७ भावाचा सब चा बायकोच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकाच्या लाभाचा सब चा पहिल्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा . जातकाच्या प्रथम भावाचा सब चा जातकाच्या दुसऱ्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा.
अशाप्रकारे नसेल तर जन्मवेळेत मिनिटे (+) किंवा (-) करून वेळ निश्चित करावी
अशाप्रकारे जातकाच्या पत्रिकेतील लग्न भावाची शुद्धी करता येते.
जातकाचे लिंग खालीलप्रकारे ठरवावे ---स्त्री , पुरुष
१) जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा विषम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत पुरुष लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर स्त्री लिंग समजावे .
२) जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा सम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत स्त्री लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर पुरुष लिंग समजावे .
अशाप्रकारे नसेल तर सब सब जुळवून घ्यावा .
Wednesday 10 August 2022
मेडिकल प्रवेश ---
फेसबुक वरील लेख वाचून एका पालकांचा फोन ..... माझ्या मुलीने आता NIIT ची परीक्षा दिली आहे . तिला मेडिकल जाण्याची खूप इच्छा आहे आणि तिला खात्री वाटते तिला प्रवेश मिळेल. तरीसुद्धा मनात थोडी धाकधूक वाटत. आहे . ऍडमिशन मिळेल कि नाही . प्रवेश नाही मिळाले तर रिपीटेशन क्लास ला बसता येणार नाही. . सद्य रिपीटेशन चे क्लास सुरु झाले आहेत. मी विचारले रिपीटेशन क्लास म्हणजे काय ? म्हणाले ज्यांना NIIT परीक्षेत स्कोअ र होणार नाही असे वाटते.अशा मुलांचे पुढील वर्षासाठी क्लासेस आतापासून सुरु करतात. प्रवेश मिळणार नसेल तर पुढील वर्षासाठी रिपीटेशन क्लास जॉईन करता येईल. ( म्हणजे पुन्हा फी भरायची ६०-७०,०००)
मी म्हटले मुलीकडे फोन द्या . मी हा प्रश्न नंबर कुंडलीनुसार सोडवायचे ठरविले. मुलीला थोडक्यात नंबर कुंडली बदल माहिती सांगितली . मला मेडिकल प्रवेश मिळेल का ? असा विचार मनात करून १ ते २४९ या मधील कोणतीही संख्या सांग . संख्या लकी नंबर असू नये. . तिने ६५ हि संख्या सांगितली . के.पी नंबर ६५ यावरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडल तयार केली .
नियम--- ४ त्या भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी , लाभाचा (११) कार्येश असेल त्याच बरोबर लाभाचा (११) सब ४ त्या भावाचा कार्येश असेल तर प्रवेश मिळे.ल . दोन्ही नियम लागू होत असतील तरच प्रवेश मिळेल. ४ त्या भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा . ४ थ्या भावाचा सब वक्री असला तरी चालेल ,फक्त त्याचा नक्षत्र स्वामी वक्री नसावा . ४थ्या भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असून आणि लाभाचा कार्येश असला तरी प्रवेश मिळत नाही .
दि --८ / ८ /२०२२ वेळ--१२=०५-५७
हि कुंडली कर्क लग्नाची आहे . ज्यावेळी कुंडलीचे कर्क लग्न असते त्यावेळी होकारार्थी उत्तर द्यावे असा एक संकेत आहे . पण हा शॉर्टकट झाला. प्रत्यक्षात कुंडलीवरून काय येते ते पहिले पाहिजे . म्हणून मी कुंडली पाहायला सुरुवात केली . नियमानुसार ४ थ्या भावाचा सब गुरु आहे आता गुरु वक्री आहे . एक निरीक्षण ज्यावेळी शिक्षणासंबंधी प्रश्न असतात गुरु किंवा बुध ची उपस्थिती असते . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --
गुरु--
शनी(व)---८ , ७ , ८ क.यु दृष्टी २ , १० ,
राहू--१० , मंगल १० ,दृ चंद्र ५ ,६ क यु दृ २
शुक्र ---१ , ११
गुरु २,५,६,७,८,१० ११ चा कार्येश आहे गुरु ११ भावाचा कार्येश आहे परंतु गुरु स्वतः वक्री असून शनी ह्या वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे .
लाभाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ----
राहू--१०,११ क .यु मंगळ १०, दृ चंद्र ५
शुक्र --१, ११, दृ ७
शनी---८ क यु
मंगळ ... १०, दृ चंद्र ५,, ११
लाभाचा सब राहू ४ चा कार्येश नाही .
सबब ह्या मुलीला मेडिकल ला प्रवेश मिळणार नाही. हे खात्रीपूर्वक सांगता येईल .( नियमानुसार ) पुन्हा पुढील वर्षी प्रयत्न करावा . असे सांगितले . अद्याप प्रवेश सुरु झाले नाहीत. घोडे मैदान जवळच आहे . प्रवेशासंबंधी कळले कि आपणाला कळवीनचं . असो .... खरे तर असे प्रश्न ज्योतिषाच्या माध्यमातून सोडवावेत का ? उत्तर होय आले तर ठीक आणि उत्तर नाही आले तर मुलगा मुलगी , चे मानसिक खच्चीकरण होऊ शकते . त्यांना टेन्शन येते. अशी मुले डिप्रेशन मध्ये गेली तर लवकर उभारी घेत नाहीत. कारण हल्लीच्या मुलांच्यामध्ये सहनशीलता खूप कमी आहे . तिने जी संख्या सांगितली ती म्हणजे ६५. या संख्येतून काय अर्थ बोध होतो. ६ भावावरून रोग आजार चा बोध होतो. ५ यावरून औषधोपचार आणि दोघांची बे रीज केली तर ११ येते म्हणजे इच्छापूर्ती. सादर जातकाची मेडिकल ला जाण्याची खूप इच्छा आहे असे दिसते. आता थोडा वेगळा विचार केला तर -- NIIT परीक्षा हि एक स्पर्धा परीक्षा च आहे . ६५ या संख्येवरून ---सुरवातीला ६ हि संख्या आहे म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर विजय असे म्हणता येईल . परंतु त्यानंतरचा ५ हि संख्या समोरच्याला लाभदायक राहील. थोडक्यात काय तर प्रवेश मिळणार नाही .. अजून एक ह्या मुलीची MBBS ला च जाण्याची आहे . ४ भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी स्थिर राशीत असेल तर MBBS ला ऍडमिशन मिळेल. पण याठिकाणी ४ चा सब गुरु मिन राशीत व त्याचा नक्षत्र स्वामी शनी मकर राशीत आहे मिन रासं द्विस्वभावी व मकर हि रास चर तत्वाची आहे येथे कोठेही स्थिर राशीचा संबंध आलेला नाही
. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट ला मी सांगितले प्रवेश मिळणार नाही. ७ सप्टेंबर ला निकाल लागला त्यात तिला खूपच कमी मार्क मिळाले . एम बी बी एस ला ऍडमिशन मिळणार नाही ह्याची तिला खात्री झाली . पुन्हा तिने प्रयत्न करायचे ठरविले आहे . . महाजनांनी मार्गदर्शन करावे .
शुभंम भवतु !!!